केस कसे धुवायचे यासंबंधीच्या या काही सोप्या टिप्स आपल्याला चमकदार आणि निरोगी केस देऊ शकतात


केसांचे सौन्दर्य वाढविण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. केसांची योग्य स्वच्छता ठेवणे हे आपल्या केसांची निगा राखण्याच्या नियमांचा एक महत्त्वाचा भाग आहे.

केस कसे धुवायचे यासंबंधीच्या काही सोप्या टिप्स आपल्याला चमकदार आणि निरोगी केस मिळवून देऊ शकतात. दीर्घकाळापर्यंत आपले केस न धुतल्यास टाळूवर (scalp) हवेतील प्रदूषण तसेच सूक्ष्म धूलिकण यांसारख्या गोष्टींमुळे केस मळकट होऊन केसांना हानी पोहचू शकते आणि वाढण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते.

केस धुणे अगदी सोपे आहे परंतु टाळू आणि केसांच्या आरोग्यावर परिणाम करणार्‍या लहान गोष्टींबद्दल अज्ञान हे निरोगी आणि मजबूत केस मिळवण्यास अडथळा निर्माण करते.

आपल्याला केस धुण्याचा योग्य मार्ग कदाचित महत्त्वपूर्ण वाटू शकत नाही, परंतु आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की आपल्यापैकी बहुतेक केस धुण्याच्या प्रक्रियेचे अनुसरण करताना काही चुका करतात. होय, अशा काही टिप्स आहेत ज्या आपल्याला आपले केस सुयोग्य पद्धतीने धुण्यास मदत करतात.

आपले केस योग्य प्रकारे धुण्यासाठी टिप्स


केस धुण्यासाठी महत्वपूर्ण टप्प्पे : 

१. केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावा: रात्रीच्या वेळी किंवा केस धुण्यापूर्वी कमीतकमी २ तास आधी आपल्या टाळूवर (scalp) नैसर्गिक तेलाने मसाज करा. 
ऑईलिंग हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण बहुतेक शाम्पूमध्ये कठोर घटक असतात जे आपल्या केसांपासून आवश्यक ते तेल सुध्दा काढून टाकू शकतात परंतु केस धुण्यापूर्वी तेल लावल्याने या समस्येपासून मुक्तता मिळते.
आपल्या केसांना तेल लावण्याचे फायदे आणि हे कसे वापरावे यासाठी टिप्स जाणून घेण्यासाठी 👈👈हे नक्की वाचा.

टीपः तेल लावल्यानंतर लगेचच केस विंचरणे टाळा. केसांना हळुवारपणे न विंचरता अगदी उग्र पद्धतीने (जोरजोराने) विंचरल्यामुळे केसांना फाटे फुटणे आणि केस तुटणे असे त्रास होऊ शकतात.

२. शॅम्पू लावण्यापूर्वी: केस धुण्यासाठी शॅम्पू लावण्यापूर्वी अगदी कोमट पाण्यात एक मिनिट तरी केस भिजवा.

३. डायल्यूटेड शॅम्पू: सल्फेट आणि पॅराबेन फ्री शॅम्पू वापरण्यास प्राधान्य द्या. केसांवर नेहमीच सौम्य शॅम्पू (पाण्यात मिसळून) लावा, ज्यामुळे त्यात असलेल्या केमिकल युक्त घटकांची तीव्रता थोडी कमी होईल. पाण्यात शॅम्पू मिसळून पातळ केल्याने केसांचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो, कारण टाळूवर शॅम्पू थेट ओतल्यामुळे टाळू अनावश्यक कोरडे होऊ शकते. 

४. डोक्याची मालिश: शॅम्पू लावत असताना, आपल्या बोटाने पुढील आणि मागील बाजूस वर्तुळाकार पद्धतीने डोक्यावर मालिश करा. हे २-३ मिनिटांसाठी पुन्हा करा. हे आपल्या टाळूला उत्तेजित आणि एक्सफोलिएट करण्यास (टाळूवरील मृत त्वचेचा स्तर काढून टाकण्यास) मदत करते.

५. आपले केस स्वच्छ धुवा: रुक्ष आणि निस्तेज केस टाळण्यासाठी आपले केस गरम पाण्याऐवजी अत्यंत कोमट पाण्याने पूर्णपणे स्वच्छ धुवा. कोमट पाणी टाळूवरील छिद्रे उघडण्यास मदत करते. आपण आपल्या केसांना शॅम्पू लावल्यानंतर, नेहमीच केस स्वच्छ धुतले गेल्याची खात्री करून घ्या, कारण शॅम्पूचे अवशेष राहिल्यास आपले केस निस्तेज दिसू शकतात आणि केसांची मुळे चिकट वाटू शकतात. त्यानंतर सौम्य कंडीशनर चा वापर करा. 

६. कंडिशनर: केस रुक्ष होण्यापासून टाळण्यासाठी कंडिशनर मदत करते. त्यामुळे शॅम्पूनंतर केसांसाठी योग्य ते कंडिशनर नक्की वापरा.

केसांच्या वाढीनुसार योग्य प्रमाणात कंडिशनर दोन्ही तळहातांवर घ्या. केस एका बाजूला घेऊन कंडिशनरचा स्तर सम प्रमाणात केसांच्या मिड लेन्थ पासून केसांच्या टोकांपर्यंत लावा. कंडिशनर लावत असताना केस जास्त ओढले जाणार नाहीत ना याची काळजी घ्या नाहीतर जास्त केस गळू शकतील. थेट टाळूवर कंडिशनर लावणे टाळा.

यानंतर, कंडिशनर पूर्णपणे केसांमधून निघून गेल्याची खात्री करा, कारण केसांमध्ये राहिलेल्या कोणत्याही कंडिशनरचे अवशेष आपल्या केसांना हानी पोहोचवू शकतात.
लक्षात ठेवा की आपण केस स्वच्छ धुण्यापूर्वी कंडिशनरला सुमारे २-३ मिनिटे आपल्या केसांवर राहणे आवश्यक आहे.

७. आपले केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा : आपले केस साध्या पाण्याने व्यवस्थित धुवून लावलेले सर्व कंडिशनर निघून गेल्याची खात्री करून घ्या. सामान्य पाण्याने केस स्वच्छ धुतल्यामुळे क्यूटिकल्स बंद होण्यास मदत होते आणि प्रत्येक हेअर स्ट्रँडमधील ओलावा सील होतो.


केस धुण्यापूर्वी आणि धुतल्यानंतर केसांची निगा राखण्यासाठी काही टिप्स


१. केस धुण्यासाठी खूप जास्त शॅम्पू आणि कंडिशनर न वापरण्याची खबरदारी घ्या, कारण त्यात असलेल्या जड रासायनिक घटकांमुळे आणि सतत वापरामुळे आपल्या केसांना नुकसान होऊ शकते.

केसांचे प्रमाण आणि केसांचा पोत हे दोन सर्वात महत्वाचे घटक आहेत ज्यावर आपल्याला किती शॅम्पू आणि कंडिशनर आवश्यक आहे ते ठरते. 

२. प्रामुख्याने पहिला तर आपला टाळू म्हणजेच स्काल्प हा हवेतील प्रदूषणामुळे खराब होत असतो त्यामुळे नेहमीच केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत (hair-tip) आपले केस स्वच्छ करा.

३. केस धुताना कधीही केस एकमेकांवर घासू नका, कारण यामुळे आपले केसांमध्ये गुंता होईल. 

४. अगदी शेवटच्या टप्प्यात नेहमीच आपण आपले केस हे सामान्य तापमान असलेल्या पाण्याने किंवा साध्या पाण्याने धुवावेत, कोमट पाण्याचा तेव्हा वापर करू नये.  

५. नेहमीच आपले केस मऊ कपड्याने सुकवलेले अधिक चांगले. टॉवेलने आपले केस चोळताना कधीही रगडू नका, यामुळे आपल्या केसांना गंभीर नुकसान होऊ शकते.

त्याऐवजी आपण केस धुवून झाल्यावर आपल्या केसांवर जमा झालेले जास्तीचे पाणी हळुवारपणे पिळण्याचा प्रयत्न करू शकता किंवा आपले केस कोरडे होण्यासाठी सोडू शकता.

६. शक्य होईल तितके हेयर ड्रायर वापरणे टाळा. त्याऐवजी, आपले केस नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या.

७. केस धुतल्यानंतर केसांमध्ये ओलावा कायम रहावा यासाठी चांगल्या प्रकारचे हेअर सीरम वापरल्यास केसांना दीर्घकाळ मऊ  ठेवण्यास मदत होईल.

८. आपले केस ओले असताना कधीही विंचरू नका. आपले केस ओले झाल्यावर ते अधिक नाजूक बनतात, कारण कोरड्या केसांना नैसर्गिक तेलांद्वारे संरक्षित केले जाते ज्यामुळे प्रत्येक केस या नैसर्गिक तेलाच्या स्तराने अच्छादला जातो आणि संरक्षित सुद्धा होतो. परंतु ओल्या केसांना शून्य संरक्षण असते, ते केस सहजपणे तुटण्याची जास्त  शक्यता असते.

९. केस ओले असताना केस वर बांधणे टाळा, गुंतागुंत टाळण्यासाठी हलक्याश्या ओल्या केसांमधून नेहमीच रुंद दात असलेला कंगवा वापरा. तसेच केसांना होणारे नुकसान टाळण्यासाठी केसांच्या टोकांपासून केस विंचरणे चालू करा आणि नंतर ते वरच्या बाजूने विंचरा.

१०. दर दोन ते तीन महिन्यांनी आपले केस कापल्यास ते केसांचा फुटलेले फाटे कमी करण्यास तसेच केसांची जलद वाढ होण्यास फायदेशीर ठरते. 

११. आपल्या केसांना घट्ट बन किंवा वेणीने बांधल्याने आपले केस व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाहीत. आपल्या केसांना झोपण्यापूर्वी चांगल्या प्रकारे विंचरा आणि त्यांना सैल वेणी किंवा पोनीमध्ये बांधा.

केसांची निगा राखणे महत्वाचे असून सोपेही आहे. आपल्या केसांची चांगली काळजी घ्या आणि स्टाईलिश राहण्यास विसरू नका.


कृपया आपल्याला माहिती उपयुक्त असल्याचे वाटत असल्यास आणि याचा फायदा झाल्यास मला कळवा. तसेच पोषणयुक्त समतोल आहार घ्या आणि निरोगी रहा. अशाचप्रकारे केसांसाठी आवश्यक अशा मूल्यांकानी युक्त असे वेगवेगळे घटक पदार्थ, आवश्यक फळे आणि केसांची निगा राखण्यासाठी इतर टिपांसाठी पुढील लेख देखील पहात रहा.

कृपया आपले प्रश्न पोस्ट करा किंवा टिपणी मधे अभिप्राय द्या. माझ्या पुढील पोस्टसाठी सूचना प्राप्त करण्यासाठी कृपया अनुसरण करा / सदस्यता घ्या.


No comments:

Post a Comment