पावसाळा, Covid-19 आणि नैसर्गिकरित्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणे

Coronavirus Covid-19 Herbal Immunity Booster Ayurvedic and Easy Home Remedies. Mansoon Immunity Boosting Tips and remedy at home रोगप्रतिकारक शक्तीसाठी कोरोना कोविड 19 सुलभ आणि नैसर्गिक घरगुती उपचार

पावसाळ्यामुळे हवामानात तसेच आरोग्यामध्ये बरेच बदल घडतात. पावसाळ्यामध्ये तापमानातील तीव्र चढउतार शरीराला वेगवेगळ्या संक्रमणास बळी पाडतात. म्हणूनच या हंगामात आपण पौष्टिक आहार आणि प्रतिकारशक्ती वाढवून आपल्या शरीराचे संरक्षण करणे महत्वाचे असते. हे आपणांस विषाणूंविरूद्ध अँटीबॉडीज तयार करून संक्रमणाविरूद्ध लढायला मदत करू शकते.

कोरोना किंवा कोविड-१९ या जागतिक साथीच्या रोगाचा प्रारंभ आणि वेगवान प्रसार हे ज्येष्ठ नागरिक, कमी प्रतिकारशक्ती आणि दीर्घकालीन आजाराने पीडित असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक असू शकते.

म्हणूनच, प्रत्येकजण, विशेषतः वयस्कांनी त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. कारण रोगप्रतिकारशक्ती रोगापासून बचाव होण्याची अधिक चांगली क्षमता प्रतिबिंबित करते. रोगप्रतिकारशक्ती जितकी चांगली तितका रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी असतो, आणि जरी संसर्ग झाला असेल तरीसुद्धा जर रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर रोगमुक्ती लवकर होण्यास मदत होते.

रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय?

रोगप्रतिकारक शक्ती ही व्हायरस, बॅक्टेरिया, परजीवी किंवा इतर हानिकारक सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण प्रदान करण्याची क्षमता आहे.
आपली  रोग प्रतिकारशक्ती सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे निरोगी आणि पौष्टिक आहार. आपल्या आहारात आणि दैनंदिन जीवनामध्ये काही निरोगी बदल आपल्या शरीरासाठी रोगप्रतिकारक बूस्टर म्हणून काम करू शकतात.

धान्य, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, सुकामेवा (DRY FRUITS) अशाप्रकारचा पूरक आहार आपल्याला आजारांविरूद्ध लढण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतो.
खाली दिलेले उपाय आणि नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती बूस्टर हे आपल्याला कोविड-१९ व इतर प्रकारच्या संक्रमणापासून संरक्षित करण्यात मदत करू शकतात.

कोविड-१९ आणि इतर संक्रमण (विशेषतः पावसाळ्यात) साठी प्रतिबंधात्मक उपाय

सामान्य उपाय
हे करा:

  1. दिवसभर कोमट पाणी प्या.
  2. दररोज योगासने, प्राणायाम, ध्यान किंवा एरोबिक्स सारख्या कोणत्याही प्रकारचा किमान 30 मिनिटांसाठी सराव. व्यायामामुळे एंडोर्फिनची पातळी वाढते (हार्मोन्स ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते आणि शरीरात सकारात्मक भावना निर्माण होते) तसेच तणाव व्यवस्थापनास मदत होते. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.
  3. दररोज भाजीपाला, ताजी फळे, सुकामेवा (DRY FRUITS) जसे खजूर, बदाम इत्यादी; तसेच दूध, संपूर्ण धान्य, सोयाबीन, डाळी आणि कडधान्यं, औषधी वनस्पती यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीरास आवश्यक पौष्टिकता दिली जाते. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊन संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी संरक्षित होते.
  4. हळद, जिरे, धणे, लसूण आणि अद्रक (आले) सारख्या मसाल्यांच्या पदार्थांचा दररोज स्वयंपाकात समावेश करावा.
  5. निरोगी रोगप्रतिकार प्रतिसादासाठी 7-8 तासाची पर्याप्त प्रमाणात झोप आवश्यक आहे कारण आपले शरीर सतत कार्य करत असते, आपल्या शरीरास पर्याप्त मात्रेत विश्रांती मिळणे आवश्यक असते. (आयुर्वेदानुसार दुपारी झोपणे टाळा पण १५-२० मिनिटे वामकुक्षी घेऊ शकता.)
  6. बाहेर खाणे टाळा. तेल, मीठ आणि साखर कमी प्रमाणात घ्या. ताजे शिजवलेले घरी तयार केलेले अन्न घ्या. (सकाळचा नाश्ता हा राजाप्रमाणे, दुपारचे जेवण हे राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण हे गुलामासारखे असावे.) हे समजून घ्या की निरोगी पाचन तंत्रासाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी न्याहारी हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे.
  7. घरीच रहा. गर्दीची ठिकाणे टाळा. इतरांपासून कमीतकमी 1 मीटर अंतर ठेवा. आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी 20 सेकंद धुवा. डोळे, नाक किंवा तोंडाला न धुतलेल्या हाताने स्पर्श करू नका आणि जेव्हा बाहेर जाणे अत्यंत आवश्यक असेल तेव्हा जाड आवरण असलेले मास्क आणि सॅनिटायझर वापरा.
  8. ताणतणाव नियंत्रणात ठेवा. तणाव आपल्या शरीरातील कोर्टीसोल हॉर्मोनची पातळी वाढवून शरीरास अपाय करू शकतो, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती अवरुद्ध होऊ शकते आणि ती कमकुवत होऊ शकते.

हे करू नका

  1. थंड पाणी / कोल्ड ड्रिंक्स / आईस्क्रीम खाणे टाळा.  
  2. तळलेले खाद्यपदार्थ खाणे टाळा.
  3. धूम्रपान आणि अति मद्यपान टाळा, जे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते आणि त्यामुळे संसर्गाशी प्रतिकार करण्याची क्षमता कमी करते.
  4. शक्य असल्यास ए.सी. (वातानुकूलन) वापरणे टाळा.
  5. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा.
  6. कोणाशीही जवळचा संपर्क टाळा.
  7. रस्त्यावर थुंकणे थांबवा.
  8. आपला चेहरा, नाक आणि तोंडाला अनेकदा स्पर्श करु नका.


सुलभ आणि नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना

Herbal Immunity Booster. Mansoon Immunity Boosting Tips at home. रोगप्रतिकारक शक्तीसाठी कोरोना कोविड 19 सुलभ आणि नैसर्गिक घरगुती उपचार

  1. सकाळी च्यवनप्राश घ्या, हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.
    डोस: - प्रौढ: 1-2 चमचे.
    मुलेः वयाच्या 3 ऱ्या वर्षापासून 1/2 ते 1 चमचा.
    *(मधुमेह असलेल्यांनी साखरविरहीत च्यवनप्राश घ्यावे)

  2. हळद दूध- अर्धा चहा चमचा हळद पावडर १५० मिली गरम दुधात दररोज रात्री घ्या.

  3. आवळा पावडर: व्हिटॅमिन "सी" चा नैसर्गिक स्रोत, आपल्या प्रतिकारशक्तीला नैसर्गिकरित्या वाढविण्यात मदत  करतो.
    डोस: - सकाळी रिकाम्या पोटी १ कप कोमट पाण्यात १ छोटा चमचा.

  4. दिवसातून एकदा / दोनदा  तुळस किंवा ताजी पुदीन्याची पाने गरम पाण्यात टाकून वाफ घ्यावी.

  5. आले व मिरपूड सिद्ध दूध: एका भांड्यात दूध उकळा. दुधात ठेचलेले १/२ इंच आले किंवा १/२ छोटा चमचा सुंठ पावडर आणि १/२ छोटा चमचा मिरपूड घाला व आणखी ५ मिनिटे उकळवा. आता दूध गाळून एका कप मध्ये ओता. *गरज भासल्यास १/४ ते १/२ चमचा साखर घालू शकता.

  6. दिवसातून एक ते दोन वेळा १/२ छोटा चमचा हळद-मीठ १ ग्लास पाण्यात घालून गुळण्या कराव्यात.

  7. हर्बल काढा:
    Herbal Immunity Booster Easy and Homemade Kadha रोगप्रतिकारक शक्तीसाठी कोरोना कोविड सुलभ आणि नैसर्गिक घरगुती हर्बल काढा
    तुळस :  ५ पाने
    दालचिनी : १/२ इंचाची काडी
    वेलची : १
    काळी मिरी : २
    हळद : १/२ चमचे
    सुंठ / आद्रक : १/२ इंच
    पाणी : ४ कप
    गूळ: चवीनुसार
    एका भांड्यात वरील सर्व साहित्य घाला आणि त्यात ४ कप पाणी घाला. सुमारे 1 कप शिल्लक राहीपर्यंत सामग्री उकळवा व गाळा. आपल्या आवडीनुसार आपण लिंबूरस घालू शकता. 
    उत्कृष्ट परिणामांसाठी दिवसातून एकदा किंवा दोनदा चहाप्रमाणे गरम गरम सेवन करा.
    (वेलची आणि काळी मिरी फ्लू आणि वेगवेगळ्या एलर्जी समस्यांमध्ये मदत करते. दालचिनी आणि आले पचनास मदत करतात, ज्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर थेट परिणाम होतो, कारण बऱ्याच आजारांची उत्पत्ती हि पोटातूनच होते.)

  8. चूर्ण :
    दालचिनी : १ भाग उदा. १० ग्रॅम

    वेलची : २ भाग उदा. २० ग्रॅम
    पिप्पली 
    : ४ भाग उदा. ४० ग्रॅम
    ज्येष्ठमध : ५ भाग उदा. ५० ग्रॅम
    मिश्री (खडी  साखर): ५० ग्रॅम  *मधुमेह असलेल्यांनी टाळावे.
    वरील प्रमाणात सर्व औषधी वनस्पतींचे बारीक पूड बनवा, एकजीव करा आणि घट्ट डब्यामध्ये (हवाबंद) ठेवा.
    १/२ चमचा वरील पावडर घेऊन, त्यात १ चमचा मध मिसळा आणि दिवसातून दोनदा सेवन करा.

जर आपणांस सर्दी, खोकला, सतत ताप, मळमळ, उलट्या, श्वास लागणे आणि थकवा येत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सभोवतालची आणि संपूर्ण शरीराच्या स्वच्छतेची सवय ठेवणे नेहमीच महत्त्वाचे असते आणि हा स्वतःचा तसेच इतरांचा बचाव करण्याचा उत्तम मार्ग आहे.


कृपया आपले प्रश्न पोस्ट करा किंवा टिप्पण्यांमध्ये खाली अभिप्राय द्या. माझ्या पुढील पोस्टसाठी सूचना प्राप्त करण्यासाठी कृपया अनुसरण करा / सदस्यता घ्या.

4 comments:

Unknown said...

Good information

Jayesh Jadhav said...

Nice information Dr.Bhavana madam.

Unknown said...

Very useful and effective information. Keep it up..

Unknown said...

Nice information Dr.Bhavna

Post a Comment