हे पेय बनविणे अगदी सोपे आहे तसेच ते झटपट तयारही होते. हे पेय कमी कॅलरी, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचे चांगले मिश्रण असून वजन कमी करण्यास देखील मदत करते. हे फळांचे आणि पालेभाज्यांचे एक चांगले मिश्रित द्रव्य आहे जे आपल्याला उत्साही ठेवते आणि दीर्घकाळसाठी भूक क्षमवते.
फायदे:
- न्याहारीसाठी उत्तम तसेच निरोगी राहण्यासाठी पौष्टिक पेय.
- आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
- उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ (फायबर) असल्यामुळे पाचन आरोग्य सुधारण्यास मदत करते.
- बनविणे खूप सोपे आहे, अगदी काही मिनिटांतच.
- कॅलरीमध्ये खूप कमी आणि पौष्टिक मूल्यांमध्ये उच्च आहे.
- पर्याप्त प्रमाणात आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी असलेल्या घटकांचे मिश्रण.
- व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवते, अशा प्रकारे कमी हिमोग्लोबिन पातळी कमी असलेल्या रुग्णांसाठी खूपच आरोग्यदायी आहे.
- पर्याप्त मात्रेत तंतुमय पदार्थ (फायबर) आणि पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यासाठी आहार-अनुकूल पेय आहे.
फक्त 5 मिनिटांतच तयार
- पालक: ५-६ पाने
- कढीपत्ता: ३-४ पाने
- नागवेलीचे (खायचे) पान: अर्धा ते १ पान
- आवळा : १/२ (मध्यम आकाराचा)
(जर आवळा उपलब्ध नसेल तर संत्र वापरता येईल.) - एक फळ: सफरचंद / पेर (सालीसकट घेणे)
- आले: १/२ इंच
- लिंबू रस - चवीनुसार
- सैंधव मीठ - चवीनुसार
कृती :
- वरील सर्व साहित्य कच्चेच घेऊन स्वच्छ धुवा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला.
- पाणी न घालता गुळगुळीत / लिंद ( बारीक ) पेस्ट बनवा.
- बारीक मिश्रण तयार झाल्यानंतर एक ग्लास पाणी घाला (अंदाजे 200 मिली).
- छान टेक्स्चर स्मूदी मिळविण्यासाठी पुन्हा एकदा मिक्सर मधून फिरवून घ्या.
या पेयाचे (स्मूदीचे) मुख्य पौष्टिक घटक: -
पालक : हे सुपर फूड तंतुमय पदार्थांसह (फायबर) लोह, कॅल्शियम, फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, कॉपर, जस्त, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारख्या पोषक पदार्थांनी परिपूर्ण आहे.
कढीपत्ता : लोह आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्त्रोत, फॉस्फरस व मॅग्नेशियममध्ये समृध्द तसेच आहारातील तंतुमय पदार्थ (फायबर), व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फोलेट ने परिपूर्ण आहे. प्रथिने पर्याप्त मात्रेत असल्याने केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे.
नागवेलीचे (खायचे) पान : कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी समूह आणि आहारातील तंतुमय पदार्थ (फायबर) चा सर्वात उत्कृष्ट स्त्रोत.
शरीराची चरबी कमी करते आणि शरीराचा चयापचय दर (metabolic rate) वाढवते.
आवळा : व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स सह परिपूर्ण स्रोत आहे.
अशा रीतीने नैसर्गिक पुनरुज्जीवन आणि इम्युनो-मॉड्युलेटिंग गुणधर्म असल्याने केस आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
आले : हे पाचन आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम कार्य करते; पाचन अग्नि वाढवून पचन सुधारते.
जिंजेरॉल हे अद्रकातील मुख्य बायो-एक्टिव्ह कंपाऊंड आहे, ज्याचे अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट प्रभाव देखील आहेत.
लिंबू : हा व्हिटॅमिन सी आणि फ्लाव्होनॉइड्सचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे - एक अँटीऑक्सिडेंट, शरीरातील पेशी खराब करू शकणारे मुक्त रॅडिकल्स प्रतिबंधित करण्यास मदत करते, विविध संक्रमणांना प्रतिबंधित करते, आरोग्य प्रदान करते.
सैंधव मीठ :
- सामान्य मीठापेक्षा श्रेष्ठ, पाचनक्रिया सुधारते आणि चयापचय वाढवते.
- सर्व आवश्यक खनिजे प्रदान करते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
- साखरेची तल्लफ कमी करते.
- त्वचेच्या असंख्य समस्या दूर करण्यात मदत करते.
- शरीरात अम्ल-अल्कलीचे योग्य स्तर राखते.
फळे :
सफरचंद :
- फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी यांसारख्या जीवनसत्वांनी युक्त तसेच उच्च प्रमाणात फायबर आणि पॉलिफेनॉलची मात्रा असल्याने अँटीऑक्सिडेंट म्हणून देखील काम करते .
- कमी सोडियम आणि उच्च पोटॅशियम असल्यामुळे हृदयासाठी अनुकूल.
- पेक्टिन नावाचे तंतुमय पदार्थ (फायबर) पर्याप्त प्रमाणात आणि कॅलरीचे प्रमाण कमी असल्याने, वजन कमी करण्यासाठी व पाचनतंत्र सुधारण्यासाठी सफरचंद खूपच आरोग्यदायी आहे.
पेर :
- कॉपर, मॅंगनीज आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत.
- व्हिटॅमिन सी, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि झिंक सारख्या पोषक तत्त्वांनी युक्त फळ.
- उच्च मात्रेत तंतुमय पदार्थ (फायबर) असल्यामुळे पाचन आरोग्यास प्रोत्साहन देते, बद्धकोष्ठतापासून मुक्त करते.
- दीर्घ कालावधीसाठी पोट भरलेले ठेवते. अशा प्रकारे वजन कमी करण्यासाठी ते अतिशय अनुकूल आहे.
- पॉलीफेनॉल नावाच्या अँटीऑक्सिडेंटचा एक उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो शरीराच्या पेशींना मूलभूत नुकसानापासून संरक्षण देतो.
प्रो टीपः लोह तसेच व्हिटॅमिन सी समृध्द फळ आणि भाज्या यांचा समावेश या पेयामध्ये असल्याने शरीरातील लोहाचे शोषण वाढवते.
कृपया आपले प्रश्न पोस्ट करा किंवा टिप्पण्यांमध्ये खाली अभिप्राय द्या. माझ्या पुढील पोस्टसाठी सूचना प्राप्त करण्यासाठी कृपया 'follow' बटणावर क्लिक करा.
3 comments:
Good immunity jus
Sahaj ani paushtik...thank you so much for dis😋
Immunity booster... Thank you so much for dis imp msg
Post a Comment