
प्रदूषण, तीव्र तापमान, वाईट सवयी तसेच अयोग्य जीवनशैली, असंतुलनात्मक आहार आणि ताणतणाव इ. अशा अनेक कारणांमुळे आपल्या केसांवर दररोज खूप आघात होऊ शकतात, परंतु आपल्या केसांना खरोखर बहुतेक अडचणींपासून मुक्त करते ते म्हणजे केसांच्या तेलाचा नियमित वापर.
केसांना तेल लावणे महत्वाचे का आहे?
आपल्या केसांना आवश्यक पोषण पुरविण्यासाठी व निरोगी ठेवण्यासाठी ऑईलिंग अतिशय आवश्यक आहे. कोणत्याही शुद्ध नैसर्गिक तेलाने डोक्यावर मालिश केल्याने केवळ केसांची वाढ होत नाही तर मन देखील शांत होते.
मालिश केल्याने रक्त परिसंचरण सुधारते, ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते. आपल्या केसांच्या त्वचेखालील कोशाच्या तळाशी मुळांपासून केस वाढत असताना, आपल्या टाळूतील रक्त हे केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा करणाऱ्या हेअर फॉलिकल्स म्हणजेच केसांच्या कोशांमध्ये जाते.
तेल कसे लावावे?
जर आपले केस अत्यंत कोरडे असतील तर आपण आपल्या केसांना तेल लावू शकता आणि नंतर टॉवेल कोमट पाण्यात भिजवून आपल्या डोक्यावर लपेटू शकता. यामुळे टाळूमध्ये तेल चांगल्या प्रकारे शिरण्यास मदत होईल.
चला नियमितपणे आपल्या केसांना तेल लावण्याच्या फायद्यांचा आढावा घेऊया.

ऑइलिंगचे फायदे
1. केसांची नैसर्गिकरित्या पोषणाची हमी.
२. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे आणि अकाली केस पांढरे होणे यांसारख्या समस्यांना प्रतिबंधित करते.
3. केसांच्या वाढीस उत्तेजन देण्यासाठी केसांच्या रोमांना मजबूत करते.
4. केसांमधील फ्रिझझिनेस कमी करून केसांना हायड्रेशन प्रदान करते.
5. केसांच्या मुळांना पोषण देते ज्यामुळे केस मुलायम राहण्यास मदत होते.
6. निर्जीव झालेल्या केसांना पोषण देऊन केसांचा पोत सुधारण्यास मदत करते.
7. केसांच्या मुळांशी स्थित असलेल्या त्वचेला आवश्यक जीवनसत्वे देऊन निरोगी ठेवते.
8. केसांना एकप्रकारची नैसर्गिक चमक मिळते.
9. केसांच्या मुळांना पोषक अशी जीवनसत्त्वे पुरविते.
10. विश्रांती प्रदान करते.
No comments:
Post a Comment